ईश्वर – मराठी कविता

ईश्वर  - मराठी कविता  (Ishwar – Marathi Kavita)

 

सर्वशक्तिमान तो

भेटून क्षणाक्षणाला 

तरीही कधीच भेटत नाही

अचानक पडलेली 

गाठ त्याची 

भेट कधीच वाटत नाही

  अचानक येतो कुठून

  अचानक जातो कुठे?

  प्रकाश देऊन अंधारात 

  गडप होतो कुठे?

वाट दावणारा 

अनोळखी प्रवाशी तो 

त्यावेळी तरी ईश्वर वाटत नाही.

सर्वशक्तिमान तो

भेटून क्षणाक्षणाला 

तरीही कधीच भेटत नाही.

- दीपक पोरे 

One thought on “ईश्वर – मराठी कविता

  1. gaurav mhatre says:

    अरे विचार काय करतोस,
    काहितरी करून दाखव..
    वेळ जाईन निघून,
    प्रवाहामध्ये तरून दाखव..
    लाखो आले अन गेले,
    बोल घेवडे सगळे..
    स्व:ता काही नाही केले,
    फ़क्त लोकाना उपदेश दिले..
    उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
    सत्याची कास धरून तर बघ..
    कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
    एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
    यश आपल्याच हातात असतं रे..
    प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
    होशील खुप मोठा,
    स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)