जन लोकपाल विधेयक Jan Lokpal Bill – Marathi

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी १६ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल, किरण बेदी, स्वामी अग्निवेश, शांती भूषण, योगगुरू रामदेव, रविशंकर यांचा सहभाग आणि पाठींबा आहे. सगळ्यात मोठा वाट या आंदोलनात असेल तर तो सामान्य जनतेचा आणि प्रसार माध्यमांचा आहे. जर भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर जन लोकपाल सारखे विधेयक (Jan Lokpal Bill) पारित करणे आणि त्यानुसार कडक कायदा आणणे हि देशाची गरज आहे.

Download Janlokpal Bill – Marathi PDF version 

मराठी मध्ये जन लोकपाल विधेयक डाऊनलोड करा 

Download

१९६९ सालापासून अनेकदा संसदेत मांडूनही आतापर्यंत मंजूर न होऊ शकलेले लोकपाल विधेयक आतातरी पारित व्हायला हवे अशीच सर्व भारतीयांची इच्चा आहे. राजकीय व्यक्ती, नोकरशहा आणि इतर भ्रष्टाचारी लोक या भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत येतील आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. लोकपाल ही एक स्वतंत्र यंत्रणा (निवडणूक आयोगाप्रमाणे) असेल कि जिच्यात सरकार कोणत्याही प्रकारे मध्यस्थी करणार नाही.

जन लोकपाल विधेयक – महत्वाचे मुद्धे ( Jan Lokpal Bill – Marathi)

लोकपाल हि स्वतंत्र व्यवस्था असेल.

हि व्यवस्था देशातील भ्रष्टाचार कमी करण्यास मदत करेल आणि भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध कारवाई करेल.

यामध्ये लोकपाल  आणि आणखी १० लोकांची कमिटी असेल 

भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तात्काळ निर्णय 

भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार

पंतप्रधानही लोक्पालाच्या कक्षेत यावेत

यात न्यायव्यवस्थाही येईल. भारताच्या सरन्यायाधीशांसकट कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा.

लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये.

दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्याच्या तरतुदींनुसार ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

2 thoughts on “जन लोकपाल विधेयक Jan Lokpal Bill – Marathi

  1. 8421618351

  2. nilesh n ubhale says:

    support to aana from me & my family

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>