काळ्या मातीवर – मराठी कविता

काळ्या मातीवर – मराठी कविता (Kalya Mativar – Marathi kavita)

 

काळ्या मातीवर तो 

कुलवाने रेघोट्या ओढायचा 

राजा सर्जाच्या सोबतीनं

दिनरात घाम गाळायचा

थकून भागून अर्धी भाकर 

आनंदानं खायचा 

अन् बहरलेलं शेत बघून 

मनातनं हसायचा 

   पण त्याचं निरागस हसणं

   आभाळाला बघवलं नाही 

   करपल अवघ पिक तरी

   ढगांनी तोंड दाखवलं नाही

पोराचं कळवळण अन् 

शेताचं जळणं…

त्यालाही जाळून गेलं.

छप्पराला लटकलेले

प्रेत त्याचं शेवटी

त्याच मातीत मिळून गेलं.

 

-दीपक पोरे 

3 thoughts on “काळ्या मातीवर – मराठी कविता

  1. PATIL VIKAS DILIP says:

    खरी किंमत शेतकर्याची.

  2. Awesome….Truth

  3. anant jagtap says:

    apli mati apli ahi ahe

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>